रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दाभोळमध्ये आंबा बागेतील खड्ड्यातून मगरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका

दाभोळमध्ये आंबा बागेतील खड्ड्यातून मगरीच्या पिल्लाची सुखरूप सुटका

दापोली : तालुक्यातील दाभोळ येथील एका आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात मगरीचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मात्र, वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या पिल्लाची सुखरूप सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

मौजे दाभोळ येथील ग्रामस्थ केतन मोरे यांच्या आंबा बागेतील पाण्याच्या खड्ड्यात २७ नोव्हेंबर २०२६ रोजी मगरीचे पिल्लू असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

त्यांनी याबाबतची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान खड्ड्यात सुमारे दीड मीटर लांबीचे मादी जातीचे मगरीचे पिल्लू असल्याचे स्पष्ट झाले.

वनकर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही इजा होऊ न देता या पिल्लाला सुरक्षितपणे पिंजऱ्यात ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आले.

ही यशस्वी बचाव मोहीम रत्नागिरी (चिपळूण) प्रादेशिक विभागाच्या विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि दापोलीचे वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दापोलीचे वनपाल रामदास खोत आणि वनरक्षक विश्वंबर झाडे यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत ही कामगिरी फत्ते केली.

Crocodile Rescue, Dabhol, dapoli news, forest department, konkan news, Maharashtra News, ratnagiri news, Wildlife Rescue

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *