रत्नागिरी : मुश्ताक खान
कोरोनाची भीती आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्हा रूग्णांचा आकडाही १३००च्या वर पोहोचला आहे. नगरिकांनी आता तरी गांभीर्य दाखवणं आवश्यक आहे. सर्वात गंभीर गोष्टमध्ये दापोलीत सर्वांधिक कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याच्या आकडीवारीकडे आपण लक्ष दिलत तर हे लक्षात येईल की दापोलीच्या १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल रत्नागिरी आणि चिपळूणातील प्रत्येकी ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. संगमेश्वरमधील देखील ६ रूग्ण दगावले आहेत. खेड तालुक्यातील ४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर गुहागरमधील २ कोरोना बाधित रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. लांजा, मंडणगड आणि राजापूर तालुक्यातील प्रत्येकी १ रूग्ण दगावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सध्याचं मृत्यू दर नक्की चिंताजनक आहे.
दापोलीमध्ये मृत्यू दर जास्त का?
तालुक्यातील स्थिती जिल्ह्यात सर्वाधिक चिंतानजक एवढ्याचसाठी आहे कारण इथं मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. रूग्णांना वेळेवर रत्नागिरीत पोहोचवण्यासाठी अनेक वेळा रूग्णवाहिका उपलब्ध होत नाहीये. १०८ रूग्णवाहिकेची कमतरता दापोलीमध्ये भासताना दिसत आहेत. खाजगी रूग्णवाहिका कोरोना रूग्ण घेऊन जायला नकार देत आहेत. दापोली रत्नागिरी अंतरही जास्त असल्यामुळे रूग्ण वेळेवर रत्नागिरी पोहोचू शकत नाहीये. अत्यावस्थ रूग्णांवर जर लवकरच उपचार करायचे असतील तर मध्यवर्ती ठिकाणी डीसीसीसी सुरू करणं आवश्यक आहे. पालकमंत्री अनिल परब यांनी याकडे गंभीर्यानं लक्ष देऊन ते सुरू करणं गरजेचं आहे.
डॉक्टरांची टीम मेहनत घेतेय पण…
डॉक्टरांकडे सोयी सुविधा खूपच कमी आहेत. कमीत कमी संसाधनांमध्ये त्यांना काम चालवावं लागत आहे. एमडी डॉक्टरची कमकरता या भागामध्ये भासत आहे, त्यावर तातडीनं उपाययोजना करणं अपेक्षीत आहे.
खाजगी दवाखाने ताब्यात घेणार का?
रत्नागिरीमध्ये काही खाजगी डॉक्टरांना कोरोनाची ड्यूटी लावण्यात आली आहे. दापोलीतीलही एका डॉक्टरांनी तशी ड्यूटी देण्यात आली आहे. पण ही संख्या अजूनही अपूरी आहे. जिल्हा प्रशासनानं खाजगी रूग्णालये ताब्यात घेतले नाहीयेत. तशी मागणी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी या आधीच केली होती. जिल्हा प्रशासनानं या मागणीकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया काही जाणकार व्यक्तींनी दिली आहे.