दापोली अर्बन बँकेचा ६४व्या वर्धापन दिन, बँकेला दर ४ वर्षांनी वर्धापन दिन साजरा करण्याची संधी मिळते. कारण बँकेची स्थापना झाली ती तारीख होती २९.०२.१९६० अशी असल्यामुळे दर ४ वर्षानी येणाऱ्या तारखेला आपण बँकेचा वर्धापन दिन साजरा करतो.

तो साजरा करीत असताना बँक बँकींग सेवेमध्ये ग्राहकांना नव्याने काही देता येईल का? याची काळजी बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर व संचालक मंडळ सातत्याने घेत असतात.

मागील ६४ वर्षामध्ये बँकेने आपल्या सर्वांच्या सहकार्याने राज्यात व देशात सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. कारण स्थापनेपासूनच संचालक मंडळाचे धोरण हे व्यापारी वर्गाला आर्थिक मदत व सामान्य माणसाला सावकारी पाशातून सोडवणूक व्हावी या तत्त्वाने वाटचाल केली आहे.

पहील्या दोन दशकात बँकेची वाटचाल ही दापोली शहर व तालक्यातील मोजक्याच गावापर्वत पोहचली होती. बँकेने आपला रोष्यमहोत्सव १९८५ साली साजरा केल्यानंतर त्याच सुमारास वाढते औद्योगीकरण व व्यापारातील निर्माण होणान्या संधीतील वाढीमुळे बँकेने आपला व्यवसाय वाढविण्याचा विचार करुन दापोलीचा आर्थिक स्त्रोत असलेले मच्छिमार बंदर व ऐतीहासीक ठिकाण हर्णे येथे पहीली शाखा दिनांक १०. ०४.१९८६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सुरु केली. सभासदांचा मोठा प्रतिसाद मिळून पहील्या दिवशी रु. ३,३३,०००/- एवढया ठेवी ठेवून ग्राहकांनी या निर्णयाचे मोठया प्रमाणात स्वागत केले. अशा प्रकारे बँकेचे कामकाज ग्रामीण भागापर्यत पोहचले.

दिनांक १८.१०.१९८७ रोजी बँकेच्या नवीन वास्तूचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे नेते पै. बॅरीस्टर अंतुले साहेब व महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री कै. विलासरावजी देशमुख यांचे उपस्थितीत व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कै. काळूरामशेठ मालू यांचे अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात हा समारंभ पार पडला. अशा पध्दतीने बँकेने स्वतः वे वास्तूमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याचवर्षी बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली, पहील्यांदाच संचालक मंडळ हे निवडणूकीद्वारे निवडून आले. त्यात नव्याने काही संचालकांना काम करण्याची संधी मिळाली.

यामध्ये विद्यमान अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर, के. जवाहर शिवप्रसाद मालू, डॉ. अनंत दत्तात्रय परांजपे, कै. श्रीनिवास केळसकर, के. शांताराम दादा टोपरे अशा वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना संचालक मंडळात काम करण्याची संधी सभासदांनी दिली. सन १९९२ मध्ये डॉ. जयवंत जालगावकर हे बँकेचे अध्यक्ष झाले आणि बँकेच्या विस्ताराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दापोली तालुक्यातील मच्छीमारांसाठी प्रसिध्द असलेल्या हर्णे या गांवी बँकेची पहीली शाखा सुरु झाली होती. त्यानंतर दापोली तालुक्यापासून जवळच असलेल्या मंडणगड तालुक्याच्या ठिकाणी, बागायती व पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या केळशी, जिल्हयाचे ठिकाण असलेले रत्नागिरी येथे यानंतर भरणे, दाभोळ, बुरोंडी अशा क्रमाने शाखा सुरु केल्या. बँकेला महाराष्ट्र कार्यक्षेत्र मिळाल्यानंतर रायगड जिल्हयातील गरिगांव व रत्नागिरी जिल्हयातील गुहागर, शृंगारतळी आणि खेदी, ता. चिपळूण येथे १३ बी शाखा सुरु करण्यात आली.

बँकेने व्यापाऱ्यांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच तालुक्यातील व जिल्हयातील रोजगार निर्मिती कशा होईल व त्या योगे उपजिवीकेचे जास्तीत जास्त साधने निर्माण करताना नैसर्गीक साधनसामुग्री, मानवी श्रम, बाजारव्यवस्था आणि ग्राहकांची गरज लक्षात घेवूनच पर्यटन उद्योगासाठी दापोलीतील माजी मंत्री व लोकनेते कै. बाबुराव बेलोसे यांचे नांवाने राबविलेली पर्यटन योजना ही तालुक्याच्या व जिल्हयाचे पर्यटन विकासाला दिलेली सर्वात मोठी चालना ठरली. आम्ही सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी पयर्टनाला वाव आहे. त्या त्या ठिकाणी व्यवसायातील अडचणी, उद्योजकाची या व्यवसायातील गरज आणि बँकेचे अर्थ सहाय्य या विषयी विशेष सभा घेवून लोकांपर्यंत ही योजना पोहचविली. त्यामुळे ही कर्ज योजना यशस्वी झाली. महाराष्ट्राला लाभलेला ७२० किलोमिटरचा समुद्र किनारा, त्यातील दाभोळ पासून केळशी पर्यंत सुमारे ७४ कि. मी. वा अंतरात पूर्वी काहीच ठिकाणी असलेली पर्यटनाच्या सुविधा या वेणान्या पर्यटकांचा ओघ पाहता ग्रुपव अपुऱ्या होत्या. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेवून बँकेने पर्यटन विकासाबाबतचा एक विशेष कार्यक्रम राबविला, या कार्यक्रमामध्ये उद्योजकाला पर्यटन विषयाचे ३ दिवसाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रशिक्षणातील प्रशिक्षक मुंबईतील नामांकीत ताज हॉटेल अशा मान्यवर संस्थेतून आले होते. या सर्वांमुळे आज दाभोळ, बुरोंडी, कोढबरे, लाडघर, मुरुड, करें, पाळदे, आंजर्ले, आडे, पाडले, केळशी इ. गांवे ही पर्यटनाचे नकाशावरती नव्याने दाखल झालेली आहेत. या योजनेमुळे छोटी मोठी अशी ३०० ते ४०० हॉटेल्स नव्याने निर्माण झाली असून या योजनेमुळे तालुक्यातील सुमारे १०००० ते १२००० लोकांना नव्याने रोजगार निर्माण झाला आहे.

समाजातील दुर्बल घटकातील लोकांसाठी, स्वतःचे घर व्हावे म्हणून त्नागिरी जिल्हयाचे माजी खासदार लोकनेते शामरावजी पेजे यांचे नावे “शामरावजी पेजे घरकुल कर्ज योजना” सुरु केली. याचा लाभ जिल्हयातील ग्रामीण भागातील लोकांना होत आहे. त्यामुळे या घटकातील लोकांचे स्वतः वे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली. बँकेची महत्वाची दुसरी योजना केंद्र शासनाने अल्पउत्पन्न गटातील महिलांसाठी कर्जरुपाने गॅस योजना जाहीर केली. बँकेने आपल्या नियमित व्याजदरापेक्षा महिलांसाठी कमी व्याजदर ठेवून ही योजना पशस्वीपणे राचविली आणि मला सांगायला आनंद वाटतो की या योजनेमध्ये सुमारे ७००० भगिनींनी पाचा लाभ घेतला आणि या कर्जाची १०० टक्के परतफेड केली हे या योजनेचे वैशिष्ट आहे.

शासनाने ग्रामीण भागामध्ये शौचालय योजना राबविण्यापूर्वी बँकेने सन २००४ साली प्र भागातील लाभार्थ्यांना रु. २,०००/- ते रु. १०,०००/- पर्यतचे कर्ज शौचालय बांधणेसाठी लाभार्थ्याला परवडेल असा (रु. २,०००/- करीता मासिक हप्ता रु. ६०/- म्हणजे प्रती दिन रु. २/-) दिल्यामुळे ही योजना खूपच यशस्वी झाली.

तसेच मच्छिमार महिलांसाठी शितपेटी योजना, विद्यार्थ्यांसाठी सायकल योजना इ. योजना यशस्वीपणे राबविल्या. या योजना सुक्ष्म वित्त पुरवठा (Micro Finance) या रिझर्व्ह बँकेच्या धोरणामध्ये रिझव्ह बँक व शासन यांचे मार्गदर्शक तत्वानुसार राबविल्यामुळे आणि त्या यशस्वी केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन डायरेक्टर मा. श्री. सत्यनारायण साहू, रिझर्क बँकेच्या अॅडव्हायजरी कमिटीचे तत्कालीन प्रमुख अर्थतन्न श्री. गिरीष बासुदेव यांनी बँकेला मुद्दामहून मेट देवून बँकेचे कौतुक केले आहे. याच कामामुळे श्रीलंका सरकारचे एक शिष्टमंडळ, श्रीलंकन सरकारचे तत्कालीन वित्तसचिव यांच्या नेतृत्वाखाली व वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टीटयुट ऑफ को-ऑप. मॅनेजमेंट पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेला मुद्दामहून भेट देवून बँक करीत असलेला सुक्ष्म वित्त पुरवठा कशा पध्दतीने होतो, योजना कशी राबविली जाते, लाभार्थ्यांचा बँकेचा नेमका सहभाग किती असतो हे जाणून घेतले. तसेच अशाच प्रकरच्या बँकेमध्ये कार्यान्वीत केल्या आहेत.

विविध योजना समजून घेण्याकरीता म्हैसूर येथील मर्चट बँकेने भेट देवून योजना समजून घेवून त्यांनी आपल्या बँकेने सामाजिक दायित्व जपताना सन १९९७ साली दापोली खेड मंडणगड या तालुक्यामध्ये सायन्स कॉलेज फॅकल्टी नसल्यामुळे तशी सोय व्हावी म्हणून बँकेने बँकेचे नफ्यातून देणगी देवून दापोली अर्बन बँक सिनिअर सावन्स कॉलेज निर्माण करुन विद्यार्थ्यांची महत्वाची शैक्षणिक गरज पूर्ण केली आहे. आज या कॉलेजमध्ये बीएससी, एमएससी, पीएबढी पर्यंतचे शिक्षणाबरोबरच सिंधुदुर्ग पासून पनवेल या विभागातील शैक्षणिकदृष्टया महत्वाचे केंद्र बनले आहे. बँक आपल्या धर्मादाय निधीतून जिल्हयातील शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करीत असते. तसेच तालुक्यातील वाचनालयासाठी पुस्तके खरेदी करणेकरीता धर्मादाय निधीतून बँक वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देते. या सर्वामुळे बँक बँकींग व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक दायित्व वेळोवेळी निभावत आहे.

बँकेच्या कामामुळे बँकेला महाराष्ट्र राज्य फेडरेशन लि. मुंबईने दिलेला सन २००४ साली राज्यातील सर्वात्कृष्ठ बँक द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार, सन २००८-०९ महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्सू. असोसिएशन लि. मुंबई यांचा कोकण विभागातील सर्वोत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार, सन २०१०-११ की महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स. असोसिएशन लि. मुंबई यांचा कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वे 3 नागरी सहकारी बैंक पुरस्कार आणि सन २०११-१२ साली दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी बैं असोसिएशन लि. मुंबईचा कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ नागरी सहकारी बँक पुरस्कार असे विविध पुरस्कार व सन्मान बँकेला मिळालेले आहेत. सन २०२३-२४ हे साल बँकेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले. बँकेची पंचवार्षिक निवडणूक ३० वर्षाच्या दिर्घकाळानंतर चिनविरोध झाली. अमेरीका येथील कॅलिफॉर्निया युनिव्हर्सिटीने बँकेचे अध्यक्ष श्री. जयवंत जालगांवकर यांना सहकार व को-ऑपरेटिक या विषयातील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तसेच प्रमोटिंग अँचीव्हमेंट फाऊंडेशन, नवी दिल्ली यांचा उत्कृष्ठ बेअरमन पुरस्कारही याच वर्षी प्राप्त झाला.

बँकेने अद्ययावत सर्व सोयी सुविधा ग्राहकांना देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. बँकेने कोअर बँकींग सोल्युशन्स अंमलात आणले असून बँकेचे स्वतःचे डाटा सेंटर कार्यान्वीत आहे. त्यामुळे अत्याधुनिक बँकींग NEFT, RTGS, ATM. POS, CTS Clearing या सुविधा चालू केल्या. सन २०२०-२२ साली Gpay. UPI, NACH, आधार मंपींग गव्हर्मेट, DBT (Direct Benefit Transfer) या सर्व सुविधांबरोबरच दापोली अर्बन बँकेच्या ६४व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी “M-Swipe – QR Sound Box” ही सुविधा दि. २९ फेब्रुवारी रोजी सभासद व ग्राहकांसाठी लोकार्पण करीत आहोत. बँकेच्या सर्व सन्माननीय सभासदांना सभासद, ठेवीदार, ग्राहक यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

– माधव रा. शेट्ये, दापोली