कोरोना विषाणू (कोव्हिड -19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश

ज्याअर्थी, शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड -19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

ज्याअर्थी, जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील उपरोक्त संदर्भ अ.क्र. 1 चे अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी “महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020” प्रसिध्द केले आहेत व त्यास अनुसरुन राज्य शासनाने निर्बंध जारी केले आहेत,

या कार्यालयाकडील क्र. उचिशा / पोल 2 / ब्रेक द चेन कडक निर्बंध सु.आ./ 2021 दिनांक 01/06/2021 रोजीच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने दिनांक 02 जून 2021 रोजीचे रात्री 12.00 वाजले पासून ते 09 जून 2021 रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाकडील उपरोक्त वाचले क्र. 6 अन्वये कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक उपायोजनेअंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी नूसार त्या त्या जिल्ह्यातील कोव्हिड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारी नुसार एकूण पाच स्तर निश्चित केलेले असुन त्या त्या स्तरानुसार संबंधीत जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल करणेत आलेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोव्हिड बाधीत रुग्णांचा आठवडा पॉझिटिव्हीटी रेट हा 13.90% असुन व्यापलेल्या ऑक्सिजन बेडसची टक्केवारी 54.81% इतकी असल्याने रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र शासनाकडील वाचले क्र. 6 अन्वये घोषित करणेत आलेल्या चौथ्या स्तरामध्ये (Level 4) समाविष्ट होत आहे.

त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारांस अनुसरून, रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 09/06/2021 रोजी रात्री 12.00 वाज पासून ते शासनाकडील पुढील आदेशापर्यंत खालील प्रमाणे आदेश निर्गमित करणेत येत आहे.

रत्नागिरी जिल्हा स्तर चार मध्ये समाविष्ठ असलेने मार्गदर्शक तत्वानुसार सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 05.00 वा. नंतर दुसरे दिवशी सकाळी 05.00 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची हालचाल / संचार करता येणार नाही. तसेच आठवडयाच्या शेवटी शनिवार व रविवारी अत्यावश्यक कारणांशिवाय व आपत्कालिन कारणांशिवाय कोणतीही हालचाल / प्रवास / संचार करता येणार नाही. पुर्णवेळ संचारबंदी लागू राहील.

अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा
सर्व दिवशी सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील

अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व
बंद राहतील

दुकाने व आस्थापना यांच्या वेळा मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह
बंद राहतील

रेस्टॉरंटस
फक्त पार्सल सेवा / घेवून जाणेसाठी आणि घरपोच सेवा सुरु राहतील.

सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / चालणे / सायकलींग
सोमवार ते शुक्रवार सकाळी 05.00 वा. ते सकाळी 09.00 वा. पर्यंत सुरु राहतील. आठवडयाच्या शेवटी शनिवार व रविवारी बंद राहतील.

खाजगी आस्थापना / कार्यालये
सुट देणेत आलेली सुरु राहतील.

कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयां सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये)
25% उपस्थितीसह सुरु राहतील.

खेळ
मैदानी खेळांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 05.00 वा. ते सकाळी 09.00 वा. पर्यंत परवानगी असेल. आठवडयाच्या शेवटी शनिवार व रविवार बंद राहतील.

चित्रीकरण
जिल्हाधिकारी यांचे पूर्व परवानगीने सुरु राहतील.

मेळावे, (सामाजिक, सांस्कृतिक / करमणुकीचे कार्यक्रम / धार्मिक, राजकीय)
बंद राहतील

लग्नसमारंभ
जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीत संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे पूर्व परवानगीने सुरु राहतील.

अंत्ययात्रा / अंत्यविधी
जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत

बैठका / निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था । सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा
50% क्षमतेसह संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे पूर्व परवानगीने सुरु राहतील

बांधकाम
बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या राहणेची सोय असेल अशा ठिकाणची बांधकामे सुरु राहतील.

कृषि व कृषि पुरक सेवा
सोमवार ते रविवार सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वा. पर्यंत सुरु राहतील.

कॉमर्स वस्तू व सेवा
फक्त अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या ई कॉमर्स सेवा सुरु राहतील.

जमावबंदी / संचारबंदी
संचारबंदी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)
50% क्षमतेसह सुरु राहतील (प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.)

माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक /मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवासावेळी प्रवाशांना सर्व नियम लागू राहतील.)
नियमित सुरु राहतील.

प्रवाशांचा आंतर जिल्हा प्रवास, खाजगी वाहने / टॅक्सी / बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे
नियमित सुरु राहतील. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यातून येणे जाणेसाठी ई-पास बंधनकारक असेल.

उत्पादक घटक – निर्यातीशी संबंधीत घटक निर्यात बंधन पूर्ण करण्याची आवश्यक असलेल्या एमएसएमई सह.
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करून येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)

उत्पादक घटक ९ अत्यावश्यक माल उत्पादन करणारे घटक (अत्यावश्यक माल आणि घटक, कच्चा माल उत्पादन करणारे घटक/ अत्यावश्यक मालासाठी आवश्यक असणारे आवेष्टन तयार करणारे घटक आणि सर्व पुरवठा साखळी घटक. 2 सर्व सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (असे घटक जे तात्काळ बंद करता येत नाहीत किंवा ठरविक वेळे शिवाय सुरु करता येत नाहीत.) 3. राष्ट्रीय सुरक्षा आणि •संरक्षणासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन घटक. ४. डाटा सेंटर/ क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर / आयटी सर्व्हिसेस, गुंतागुंतीच्या पायाभूत सेवा सुविधांना आवश्यक असणारे घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, सदर कामगार बाहेरुन प्रवास करुन येणार असल्यास त्यांची प्रवासाची व्यवस्था स्वतंत्र वाहनातून करणेच्या अटीवर (ट्रान्सपोर्ट बबल)

उत्पादन घटक इतर क्षेत्रातील सर्व उत्पादन – घटक जे अत्यावश्यक सेवा निरंतर प्रक्रिया उद्योग अथवा निर्यात करणारे घटक या मध्ये अंतभूत नसणारे सर्व उत्पादन घटक
50 % कर्मचारी क्षमतेसह, कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहणेची सोय असल्यास किंवा कामाच्या ठिकाणा जवळच स्वतंत्र कॉलनी मध्ये राहणारे व ज्यांच्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे असे कर्मचारी.

सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना :

1) ज्या आस्थापना सुरु ठेवण्यास मुभा दिलेली आहे अशा आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना किंवा आस्थापनेच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी / जाण्यासाठी विहीत केलेल्या वेळेनंतर सुध्दा परवानगी राहील.

2) कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना ही 100% उपस्थितीसह सुरु राहतील.

3) अत्यावश्यक सेवा मध्ये पुढील गोष्टीचा समावेश असेल –

1. रुग्णालये, रोग निदान केंद्रे, क्लिनिक्स, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनीटस् सह विक्रेते, वाहतुकदा व पुरवठा साखळी याचा समावेश असेल. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैदयकीय उपकरणे, त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उदयोग व सहाय्यभूत सेवा यांचाही समावेश असेल.

2. पशुवैदयकीय सेवा / पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खाद्य दुकाने,

3. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.

4. किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने, शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 09.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

5. शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा.

6. विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा, 7. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे.

8. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. 9. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा

10. SEBI प्राधिकृत बाजार व कार्यालये, Stock Exchange, व त्यासंबंधित अन्य आस्थापना

11. दुरध्वनी संबंधित सेवा 12. मालाची / वस्तुंची वाहतुक.

13. पाणी पुरवठा सेवा.

14. कृषी विषयक सेवा सुरळीतपणे चालू ठेवणेसाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश राहील.

15. सर्व वस्तूंची आयात निर्यात

16. ई कॉमर्स (अत्यावश्यक माल आणि सेवा यांचा पुरवठा)

17. मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा 18. पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने (जसे की समुद्रातील व किनाऱ्यावरील उत्पादने )

19. सर्व कार्गो सेवा

20. डेटा सेंटर / क्लाऊड सव्र्हींस /आय टी सेवा ज्या पायाभूत सुविधा आणि सेवा पुरवितात

21. सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा

22. विदयुत आणि गॅस पुरवठा सेवा

23. एटीएम सेवा

24. टपाल सेवा

25. बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती

26. लस / जीवनरक्षक औषधे / औषधी उत्पादने यांचे संबंधी वाहतुक करणारे कस्टम हाऊस एजेंट, परवानाधारक मल्टी मोडल ऑपरेटर्स

27. कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल / पॅकेजींग साहित्य बनविणाऱ्या आस्थापना

28. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने

29. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा.

4) सुट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना –

a. केंद्र, राज्य स्थानिक स्वराज्य संस्था यांची कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली सर्व

संविधानिक प्राधिकरणे व संस्था

b. सहकारी, को-ऑपरेटीव्ह, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका

c. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये d. विमा मेडीक्लेम कंपनी

e औषध उत्पादन करणाऱ्या आस्थापना व त्यासाठी लागणारे साधन सामग्री उत्पादक तसेच त्याच्याशी संबंधित कार्याल 1. RBI ने नियमित केलेल्या संस्था आणि मध्यस्थांसह प्राथमिक विक्रेते CCIL, NPCL पेमेंट सिस्टीम ऑपरेटर, RBI ने नियमन केलेल्या बाजारातील वितीय बाजाराच्या सहभागासह

g. सर्व बिगर बँक वित्तीय संस्था,

h. सर्व सुक्ष्म वित्त संस्था

i. अभियोक्तांची (वकील) कार्यालये, जसे की कोर्टाचे कामकाज, न्यायाधीकरण किंवा चौकशी आयोग यांची कार्यालये

हा आदेश हा दिनांक 09 जून, 2021 रोजी रात्री 12.00 वाजले पासून शासनाकडील पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहील. उपरोक्त प्रमाणे निर्बंध व सुट देण्यात आलेल्या बाबी यांचेबाबत शासनाकडून तसेच स्थानिक प्राधिकारणाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले आदेश व कोव्हीड-19 संदर्भात वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती / आस्थापना / घटक या कोव्हिड-19 वर्तणुकीचे / शिष्टाचाराचे पालन करणार नाहीत त्या यापूर्वी निर्ममित करणेत आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील, तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आलेस कोव्हीड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित आस्थापना बंद करणेत येतील. तसेच कोणत्याही बाजारपेठेत गर्दी झाल्यास व त्यामुळे कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास संबंधित बाजारपेठ स्थानिक प्राधिकरणा मार्फत त्वरीत बंद केली जाईल, व गर्दी करणारे दंडात्मक कार्यवाहीसाठी पात्र राहतील. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

घरपोच सेवा देणाऱ्यांनी कोव्हिड-19 चे सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.