मुंबई: राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजीच्या व्हॅटमध्ये १०. ५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सीएनजी स्वस्त होणार असून रिक्षा टॅक्सी चालक यांना दिलासा मिळणार आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ – २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली. नैसर्गिक वायूवर साडेदहा टक्क्यांनी व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायूवरचा कर कमी केल्याने पीएनजीही स्वस्त होणार आहे. मात्र पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सरकारने करकपात केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
राज्यात सीएनजी होणार स्वस्त
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात सीएनजीच्या व्हॅटमध्ये १०. ५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
Similar Posts
View All
‘समान काम, समान वेतन’ द्या; वेतन सुधारणेच्या मागणीवर ठाम असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, कामकाज ठप्प
लाचखोर मेरीटाईम अधिकाऱ्यासह दलालाला रत्नागिरीत अटक; ६० हजारांची लाच घेताना एसीबीची मोठी कारवाई
रत्नागिरी डाक विभागाच्या विशेष सेवेला उदंड प्रतिसाद; २८ देशांमध्ये पोहोचला एक हजार किलो दिवाळी फराळ
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दापोलीत वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
दापोलीत फर्निचर मार्टच्या सामानाला आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Leave a Reply