[wpedon id=”1120″ align=”right”]


दापोली | मुश्ताक खान 

चक्रीवादळात नुकसानग्रस्त शाळांना मदत करण्याचं पवित्र काम कोकणचे सुपुत्र व दुबई स्थित उद्योजक बशीर हजवानी यांनी केलं आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या जेएमबीआर फाऊंडेशच्या वतीनं त्यांनी 12 शाळांना आर्थिक सहाय्य केलं.

निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकण व त्यात प्रामुख्याने दापोली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. घरांचं, शेती, फळबागा तसेच शाळांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं होतं. शाळा तसेच इतर शैक्षणिक इमारतींची पडझड व नुकसान ही देखील महत्वाची बाब आहे.

आमदार योगेश कदम यांनी तत्परतेने पाठपुरावा करून व इतर सेवाभावी संघटना, समूह व दानशूर व्यक्तींना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला सकारत्मक प्रतिसाद देत बशीर हजवानी मदतीचा हात दिला.

बशीर हजवानी, एमडी-जेएमबीआर

जेएमबीआर फाऊंडेशनच्या वतीने दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त माध्यमिक शाळांना पुनर्बांधणीसाठी आर्थिक सहाय्य केलं गेलं. दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते तालुक्यामधील माध्यमिक शाळांना आर्थिक सहाय्य दिलं गेलं.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख प्रदिप सूर्वे, तालुकासंघटक उन्मेश राजे, सुनील दळवी, जेएमबीआर फाऊंडेशनचे फजल रखांगे, जावेद सारंग, जि. प. सदस्या रेश्मा झगडे व माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शाळांची नावे पुढीलप्रमाणे :

१) मराठामंदिर सी. बी. एस. ई इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली.

२) आडे पंचक्रोशी बेहरे हायस्कूल, आडे.

३) बहुजन हिताय हायस्कूल, आगरवायंगणी.

४) पी. डी. विद्यालय, केळशी.

५) एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड.

६) सरस्वती हायस्कूल, ओणनवसे.

७) श्रीराम हायस्कूल, पाजपंढरी.

८) गो. गु. दळवी हायस्कूल, वेळवी.

९) विरेश्वर महाविद्यालय, विरसई.

१०) एम. के. हायस्कूल, आंजर्ले.

११) एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णे.

१२) नवभारत हायस्कूल, जामगे ता. दापोली.

Advt.