दापोली : चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण घरेच उध्वस्त झाली.तेथील गरजू लोकांना,गोरगरीब नुकसान ग्रस्तांना ‘अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ’, दापोलीकडून प्रत्यक्ष संबंधितांकडे जाऊन दोनशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तब्बल पस्तीस ते चाळीस तास पाण्याखाली राहिल्याने घरात खायला तर नाहीच परंतु प्यायला पाणीही उपलब्ध नसल्याने आणि अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने चिपळूनकरांची वाताहत पाहून अखिल शिक्षक संघाने दापोलीतून चिपळूणला मदतीचा हात देण्यासाठी धाव घेतली.पाणी ओसरताच परिस्थितीनुरूप खाण्यापिण्याच्या पदार्थांसह अत्यावश्यक वस्तूं प्रत्यक्ष घरोघरी जाऊन दिल्या.सदर जीवनावश्यक वस्तूंच्या कीटमध्ये १ डझन पाणी बाॅटल्स, आटा ५ किलो, तांदूळ २किलो, कडधान्यं (मूग,मटकी), डाळ १किलो,
साखर १किलो, मीठ १पॅकेट,
तेल १पॅकेट, चहापावडर १,
हळद १पॅकेट, गरम मसाला १पॅकेट, कांदा २किलो, बटाटा २किलो,मोहरी १पॅकेट
बिस्कीट पुडे५ फरसाण २किलो
अंघोळीचा साबण१
कपडेचा साबण१, मेणबत्ती-५ काडीपेटी-२ आदि अनेकविध वस्तूंचा समावेश होता. संघटन नेतृत्व,शिक्षक नेते आणि स्फूर्तिस्थान रमाकांत शिगवण यांनी पूरग्रस्तांना सहाय्य करण्याची ‘साद’ दिली,आणि सर्व शिक्षक बंधुभगिनींनी ‘आर्थिक प्रतिसाद’ देऊन सत्कार्यात ‘लाखमोलाचा वाटा’ उचलला. मुग्धा सरदेसाई यांच्या एका व्हाट्सअप्प मेसेजवरून एकाच दिवसात सुमारे दोन ते अडीच लाखाचा निधी पूरग्रस्तांसाठी उभारण्यात आला. यापूर्वीही सांगली पूरग्रस्तांना, निसर्ग चक्री वादळग्रस्तांना आणि कोरोना काळातही शेकडो कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ‘अखिल’ संघटनेने केलेले आहे. भविष्यातही मदतीचा हात पुढे करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे अखिलचे जिल्हाध्यक्ष काटकर यांनी सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष विजय फंड आणि संघटनेतील असंख्य शिक्षक बंधू भगिणींनी प्रत्यक्ष चिखलातून वाट काढत गरजूंपर्यंत साहित्य सुपुर्द केले. सर्वत्र पाणीच पाणी होते; पण पाण्यावाचून तडफडणार्‍या जनतेकडे पाहून मन हेलावून गेल्याचे,अध्यक्ष विजय फंड यांनी सांगितले. यशस्वी नियोजन आणि कार्यवाहीसाठी, बाबू आग्रे,विवेक कालेकर, भालचंद्र घुले,संदिप गुंजाळ आणि सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी रमाकांत शिगवण,सुनिल कारखेले,गुलाबराव गावीत यांचेसह अखिलचे सर्व सदस्य उपस्थित होते.