महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनानिमित्त संवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रात्री आठ वाजता शिवसैनिकांशी संवाद साधतील. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिंकाशी संवाद साधतील त्यावेळी कोणत्या मुद्यांवर ते भाष्य करतील हे पाहावं लागणार आहे. मुंबई महापालिका निवडणूक, शिवसेनेची आगामी निवडणुकांमधील वाटचाल आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी या विषयावर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे या संवादाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या निमित्तानं कानमंत्र देण्याची शक्यता आहे.