रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. आज शुक्रवारी (दि. २१) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत २२४ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापूर्वीचे मृत्यू रूग्ण एक आणि आजचे मृत्यू रूग्ण दोन असे मिळून तीन रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर १९७ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ६१
▪️संगमेश्वर १४
▪️दापोली १८
▪️रत्नागिरी ६१
▪️लांजा ४
▪️राजापूर ९
▪️खेड १७
▪️गुहागर ३३
▪️मंडणगड ७
एकूण २२४