रत्नागिरी दि. १४ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार 15 जानेवारी 2022 रोजी पहाटे 05.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून तेजस एक्सप्रेस ने रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता तेजस एक्सप्रेस ने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी 11.15 शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने पावस, ता.जि.रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता रत्नागिरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : पावस, रत्नागिरी). दुपारी 12.30 वाजता पावस येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 01.00 वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, रत्नागिरी उपकेंद्र व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी आढावा बैठक तसेच ढोकमळे, ता.रत्नागिरी येथे प्राणिसंग्रहालय उभारणे व सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणेसंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) दुपारी 02.00 वाजता तारांगण, रत्नागिरी शहरातील रस्ते, शहर नळ पाणीपुरवठा योजना इ. व इतर विकास कामांचा आढावा (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). दुपारी 03.00ते 03.30 वाजता राखीव. दुपारी 03.30 वाजता मतदार संघातील विविध विकासकामांचा कामनिहाय आढावा. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सायंकाळी 05.00 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी). सायंकाळी 05.20 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथून मोटारीने काळबादेवी जेट्टीकडे प्रयाण. सायंकाळी 05.30 वाजता काळबादेवी जेट्टी उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : काळबादेवी जेट्टी, रत्नागिरी). सांयकाळी सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.

०००