दापोली: दापोली नगरपंचायतयत सार्वत्रिक निवडणूक सन २०२१/२२ कामी मा. निवडणूक आयोगाचे आदेशानुसार उर्वरित ४ प्रभागांची निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे. दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकी करीता निवडणूक निरिक्षक म्हणून श्री. संजय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांची नेमणूक विभागिय आयुक्त कोकण विभाग यांनी केली आहे.
दापोली नगरपंचायतीच्या ०४ प्रभागाकरीता उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी हा सोमवार दि. १०.०१.२०२२ दुपारी ३.०० पर्यंत आहे. निवडणूकी करीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण दि. १२.०१.२०२२ रोजी पार पडणार आहे. तसेच तिसरे अंतिम प्रशिक्षण व मतदान साहित्य वाटप दि. १७.०१.२०२२ रोजी तहसिल कार्यालय, दापोली या ठिकाणी होणार आहे.
मतदान केंद्रावर दिनांक १८.०१.२०२२ रोजी प्रत्यक्ष मतदान सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० पर्यंत या वेळेत होणार आहे. मतमोजणी दि. १९.०१.२०२२ रोजी श्री शिव छत्रपती सभागृह, तहसिलदार कार्यालय, दापोली या ठिकाणी सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरु होणार आहे. दापोली नगरपंचायतीची आदर्श अचारसंहिता दि. २४/११/२०२१ पासून लागू झाली असून
आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची सर्व नागरीकांनी दक्षता घ्यावी. तसेच कोणत्याहीआमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करावे असे जाहीर आवाहन निवडूक निर्णय अधिकारी नगरपंचायत दापोली यानी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

नगरपंचायतीमध्ये आचारसंहिता व तक्रार निवारण पथक, खर्च सनियंत्रण पथक, कायदा व सुव्यवस्था पथक, व्हिडीओ सर्वेलियन्स पथक, भरारी पथक, चेकपोस्ट सर्वेक्षण पथक असे विविध पथक तयार करणेत आले असून सदर पथकामार्फत नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरीकांची निवडणूकी बाबत ची कोणतीही शंका अगर तक्रार असल्यास दापोली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष भेटून शंकेचे निराकरण करुन घ्यावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे नगरपंचायती मार्फत जाहिर आवाहन करणेत येत आहे.