दापोली उद्या सोमवार १९ जुलै पासून दापोली आगारातून दापोली – मुंबई साधी गाडी सकाळी सहा वाजता नागरिकांच्या मागणी नुसार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येत असून ही गाडी मुंबई येथून दुपारी दिड वाजता सोडण्यात येणार असल्याची माहिती दापोली आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी दिली.गेले काही दिवस या पुलावरून एसटी वाहतूक बंद होती. पूल दुरुस्ती होऊन सुरु झाल्यावर धावणारी ही पहिली एसटी बस आहे. १२ कोटी रुपये खर्चून हा पूल नुकताच दुरुस्त करण्यात आलाय.राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पूजन करून पुलाच्या वाहतूक नुकतीच सुरू करण्यात आली होती. दरम्यान याच ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्तावही शासनाकडे देण्यात आला आहे.याचा पाठपुरावा राज्यमंत्री ना.आदिती तटकरे व दापोली विधानसभा चे आ. योगेश कदम करीत आहेत.