माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा व घरं आहेत.

यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. यामध्ये काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.