रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा हळुहळु कमी होऊ लागली आहे. आज शुक्रवारी (दि. १६) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत आज २४७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापुर्वीचे मृत्यू रूग्ण ६ आणि आजचे मृत्यु रूग्ण ३ असे मिळून ९जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ५९रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी ७५
▪️दापोली ३४
▪️चिपळूण ५३
▪️संगमेश्वर २६
▪️गुहागर ८
▪️खेड २५
▪️राजापूर १२
▪️लांजा ११
▪️मंडणगड ३
एकूण २४७
