रत्नागिरी दि. 23 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 12.86 मिमी तर एकूण 115.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 06.80 मिमी , दापोली 08.80 मिमी, खेड 18.70 मिमी, गुहागर 15.30 मिमी, चिपळूण 07.20 मिमी, संगमेश्वर 16.30 मिमी, रत्नागिरी 19.20 मिमी, राजापूर 10.30 मिमी,लांजा 13.10 मिमी.

नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 23 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे. चिपळूण तालुक्यात मौजे कुडवशी-माडवे येथे रस्ता खचला आहे. सदर ठिकाणी सा.बां. विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम चालू, एकेरी वाहतूक सुरु आहे. गुहागर तालुक्यात मौजे आरे येथील सिध्दार्थ संदेश साठले वय 22 वर्षे व प्रतिक किसन नावले वय 24 वर्षे हे दोघे मासे पकडण्यासाठी गेले असता खाडीत पडून मयत झाले.