शिक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्यात ऑनलाईन शाळा, महाविद्यालयने सुरु होत आहेत. त्यामुळे काही शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त मुंबई लोकलमधून प्रवासाची मुभा नाही. आता शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांना परवानगी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार, असे आश्वासन आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाला दिले.
