दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा चव्हाण हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वरा हिने १७ वर्षांखालील गटात गोळाफेक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

या शानदार कामगिरीच्या जोरावर तिची आता थेट जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय थाळीफेक स्पर्धेतही तिने आपली चमक दाखवत कांस्य पदक पटकावले.

स्वराच्या या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, मुख्याध्यापिका रितू मेहता आणि क्रीडा मार्गदर्शक सुहास नलावडे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.

या योग्य आणि मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवणे शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. स्वराच्या या यशाने शाळेच्या तसेच परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.