दापोली : पर्यटकांनी गजबजलेल्या दापोली शहरात ‘अल-सईद’ या नव्या परफ्युम ब्रँडच्या दालनाचा शानदार शुभारंभ झाला आहे. सुगंधाच्या दुनियेत दापोलीचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करण्याच्या उद्देशाने हे दालन सुरू करण्यात आले असून, याचे उद्घाटन दापोलीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या हस्ते पार पडले.
पूर्णपणे स्थानिक पातळीवर तयार झालेला हा ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दापोलीचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास खालिद रखांगे यांनी व्यक्त केला आणि दालनाचे मुख्य संचालक इस्माईल रखांगे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दापोलीतील एका तरुण मुलाने कमी वयात स्वतःचा ब्रँड लॉन्च केल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले व हा ब्रँड महाराष्ट्र, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांनी या किफायतशीर आणि दर्जेदार परफ्युमचा अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

‘सुगंध आमचा, ओळख तुमची’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या दुकानात ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आणि मन मोहून टाकणारे विविध सुगंध उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यामुळे दापोलीकरांना आता आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक नवा आणि खास सुगंधी दरवळ मिळवून देण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

