दापोली : रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, दापोली यांच्या वतीने ‘फिजिओथेरपी सप्ताह सिनर्जी २०२६’ अंतर्गत दापोली शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी एका विशेष मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बुधवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, दापोली येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना फिजिओथेरपीशी संबंधित तपासणी, योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपचारविषयक सल्ला तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पाठीचे दुखणे, सांधेदुखी, मानदुखी तसेच इतर शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
दापोली शहर तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामराजे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

