दापोली : तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असणारे प्रमोद पांगरकर आज दहीहंडीच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पक्षामाध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पांगरकर यांचा सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वावर वाढला असून ते विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असल्याचे दिसत होते.

त्यांची पक्षातील नेत्यांशी वाढलेली जवळीक आणि वाढता जनसंपर्क पाहता ते लवकरच कमळ हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

अखेर आज दहीहंडीच्या उत्सवाचे औचित्य साधत ते भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे दापोलीतील राजकीय समिकरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे.