रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे आणि लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्सची तपासणी व ऑपरेशन मोफत करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू रुग्णांना या शिबिराचा विशेष लाभ होणार असून, हे शिबिर शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.

शिबिरात येताना रुग्णांनी सर्व जुने रिपोर्ट्स, सोनोग्राफी, पायाचा डॉपलर तपासणी रिपोर्ट तसेच मूळ रेशन कार्ड व आधार कार्डाची प्रत घेऊन यावे. ज्या रुग्णांना दुर्बिणीद्वारे किंवा लेसरद्वारे उपचाराची आवश्यकता असेल, अशा रुग्णांना मोफत उपचार अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपलब्ध करून देण्यात येतील.

या शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून उदय सामंत, आमदार किरण (भैय्यासाहेब) सामंत तसेच मदन गोरे (अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर) आणि अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार किरण सामंत व आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ८९२८७३६९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा. गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

  • Pointers
  • उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, अथायु हॉस्पिटल कोल्हापूर, उदय सामंत वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर
  • रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी विशेष मोफत तपासणी व ऑपरेशन सुविधा
  • दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, पित्ताशयातील खडे तपासणी व उपचार
  • लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स तपासणी व ऑपरेशन मोफत
  • शिबिराची तारीख : शनिवार, २० डिसेंबर २०२५
  • वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत
  • स्थान : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी
  • शिबिरात येताना जुने रिपोर्ट्स, सोनोग्राफी, डॉपलर रिपोर्ट, रेशन कार्ड व आधार कार्डाची प्रत घेऊन यावी
  • आवश्यक उपचार असलेल्या रुग्णांना मोफत उपचार अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपलब्ध
  • प्रमुख उपस्थिती : उदय सामंत, आमदार किरण (भैय्यासाहेब) सामंत, मदन गोरे (अथायु हॉस्पिटल) व अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ
  • संयोजन : आमदार किरण सामंत व आरोग्यदूत मंगेश चिवटे
  • नाव नोंदणी व माहितीसाठी संपर्क : ८९२८७३६९९९
  • गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा