नोएडा : जगातील सर्वात उंच प्रतिमा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे डिझायनर आणि ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम वनजी सुतार यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.

त्यांनी नोएडा येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. लांब आजाराने ते ग्रस्त होते.

राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावी झाला.

त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांसह अनेक महापुरुषांच्या प्रतिमा साकारल्या.

त्यांच्या कलाकृती जगभरातील शंभराहून अधिक शहरांमध्ये स्थापित आहेत.

त्यांना पद्मश्री (१९९९), पद्मभूषण (२०१६) आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेला मोठा धक्का बसला असून कला क्षेत्रात शोकाची लाट पसरली आहे.

त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.