दापोली : निर्मळ ग्रुप ग्रामपंचायत गिम्हवणे-वणंदच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी प्रमोद झगडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

प्रमोद झगडे यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यात ३७ वर्षे यशस्वी सेवा बजावली असून, निवृत्तीनंतर आता आपल्या अनुभवाचा आणि कार्यकौशल्याचा उपयोग गावातील तंट्यांचे निराकरण करण्यासाठी आणि गावात शांतता, सौहार्द व एकता प्रस्थापित करण्यासाठी करणार आहेत. त्यांच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून, त्यांच्या निवडीमुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांनी प्रमोद झगडे यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून गावाला योग्य मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड गिम्हवणे-वणंद गावाच्या सामाजिक एकतेला नवा बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.