दापोली  – दापोलीतील लो. टिळक चौक, बाजारपेठ येथील ‘श्री मानाचा गणपती’ मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गणेशोत्बर निमित्त आयोजित या कार्यक्रमात पारंपरिक ‘मानाची पैठणी’ जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

आज गुरुवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

‘होम मिनिस्टर’ हा मराठी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे, आणि याच धर्तीवर दापोलीत आयोजित या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक महिलांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि विविध खेळांमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

श्री मानाचा गणपती मंडळाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या अनोख्या कार्यक्रमाची कल्पना मांडली आहे.

या कार्यक्रमासाठी मंडळाने जय्यत तयारी केली असून, परिसरातील महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ‘मानाची पैठणी’ असून, ती जिंकण्यासाठी महिलांमध्ये चुरस दिसून येणार आहे.