दापोली: मुंबई विद्यापीठाच्या 58 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागीय फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजने 9 नामांकने मिळवत विभागीय जनरल चॅम्पियनशिपमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. मोरवंडे-बोरज, खेड येथील ज्ञानदीप महाविद्यालयात झालेल्या या स्पर्धेत कॉलेजने आपला दबदबा कायम ठेवला.
साहित्य स्पर्धा प्रकारात कॉलेजने 4 पारितोषिके मिळवली. श्रुती साखळकर आणि पार्थ सामल यांनी मराठी वादविवाद स्पर्धेत, तर रसिका बर्वे आणि फरहा भार्दे यांनी इंग्रजी वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तसेच, श्रुती साखळकरने मराठी वक्तृत्व स्पर्धेत आणि फरहा भार्देने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. संगीत स्पर्धेत आयुष मुलुखने पाश्चात्य वादन स्पर्धेत प्रथम, तर शार्दुल आठल्येने तालवाद्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. फाईन आर्ट विभागात महेश मालगुंडकरने मातीकाम स्पर्धेत प्रथम आणि महेक रमजानेने मेहंदी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. स्किट स्पर्धेत श्वेता मुलूख, महेश मालगुंडकर, समीक्षा टिकारे, ऋतुराज पवार, रितू खामकर, राधिका बर्वे, आयुष मुलुख, मंथन मुलुख, सोहम किजबिले यांच्या संघाने दुसरे पारितोषिक पटकावले.
या यशात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता, नाट्य विभाग समन्वयक प्रा. अजिंक्य मुलुख, संगीत विभाग समन्वयक प्रा. अनिरुद्ध सुतार, तसेच प्रा. विश्वेश जोशी, प्रा. सिद्धी साळगावकर, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. स्वाती देपोलकर आणि माजी विद्यार्थी जयवंत काटकर, सिद्धेश मुलुख, मकरंद सोमण, मुकेश भुवड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे आणि उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.