दापोली : रामराजे महाविद्यालयाचा हॉटेल मॅनेजमेंट विभाग ‘रानमाया’ या रानभाज्यांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करत आहे.
या प्रदर्शनात कोकणातील भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली, चिचार्डी, चूच, प्याव, दार, मायाळू, तेरी, अळू, कोवळा बांबू, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, खापरफूटी, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, आंबाडी, सुरण, उंबर यांपासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायी पाककृतींचे सादरीकरण होईल.
रत्नागिरी येथील प्रगतशील शेतकरी आणि ‘जॅकफ्रूट किंग’ मिथिलेश देसाई कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
हॉटेल मॅनेजमेंट विभागाने सर्वांना या प्रदर्शनाला भेट देऊन रानभाज्यांच्या चवीचा आनंद घेण्याचे निमंत्रण दिले आहे.