रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी भारतीय जनता पार्टी (भाजपा) शहर मंडळातर्फे जिल्हा कार्यालयात उत्स्फूर्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि महिला जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात ६१ महिला आणि पुरुष रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शिबिराची सुरुवात महिला मोर्चाच्या अध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या रक्तदानाने झाली. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला महिला मोर्चा, युवा मोर्चा, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाने सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वृद्धिंगत होण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये संदीप उर्फ बाबू सुर्वे, निलेश आखाडे, विक्रम जैन आणि मयेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.