दापोली : दापोली तालुक्यामधील सन 2025 ते सन 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण आज, दिनांक 14 जुलै 2025 रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले आहे.
एकूण 106 ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तहसीलदार अर्चना बोंबे यांनी ही माहिती दिली.
आरक्षण तपशील खालीलप्रमाणे:
- अनुसूचित जाती स्त्री: विसापूर, शिर्दे
- अनुसूचित जाती: नानटे
- अनुसूचित जमाती स्त्री: पिसई, मुगीज, माटवण
- अनुसूचित जमाती: वणौशी तर्फे नातु, आवाशी, वांझळोली
- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (OBC Female): इनामपांगारी, करजगांव, कवडोली, कादिवली, टांगर, नवशी, भोमडी, शिरसाडी, साखळोली, आडे, आंबवली बु., उंबर्ले, गव्हे, पालगड
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): आपटी, खेंर्डी, पन्हाळेकाझी, पाजपंढरी, फणसू, भोपण, शिवाजीनगर (दा), हातिप, गिम्हवणे, तेरेवायंगणी, देगाव, भडवळे, मौजे दापोली, विरसई, साकुर्डे
- सर्वसाधारण स्त्री (General Female): अडखळ, आगरवायंगणी, आसूद, ओणनवसे, कर्दे, कांगवई, कात्रण, कुंभवे, कोळथरे, गावतळे, चिखलगाव, जामगे, जालगांव, टेटवली, डौली, ताडील, नवसे, पांगारी तर्फे हवेली, पाडले, बोंडीवली, रुखी, वडवली, वेळवी, शिरखल, शिरवणे, सातेरे तर्फे नातू, सुकोंडी, सोवेली, कुडावळे, कोळबांद्रे, पोफळवणे, वाकवली, सडवे, हर्णे
- सर्वसाधारण (General): करंजाणी, असोंड, आंजर्ले, इळणे, उंबरशेत, उन्हवरे, उसगांव, करंजाळी, कळंबट, केळशी, टाळसुरे, दमामे, दाभोळ, देहेण, नवानगर, पाचवली, बांधतिवरे, बुरोंडी, महाळुंगे, मुर्डी, लाडघर, वनौशी तर्फे पंचनदी, शिरसोली, शिवाजीनगर (सा), सारंग, सोंडेघर, कोंगळे, कोंढे, गुडघे, चंद्रनगर, दाभीळ, पंचनदी, मांदिवली, मुरुड