खेड : येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी, क्रमांक 7) म्हणून झाली असून, त्यांनी तिथे आपला कार्यभार स्वीकारला आहे.

वैशाली पाटील या यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) म्हणून कार्यरत होत्या.

त्यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग, गुहागर आणि दापोली येथे तहसीलदार म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे.

त्यामुळे खेड येथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्या योग्य न्याय देतील, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.