दापोली : दापोली पोलीस स्थानकाचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांचे होमगार्ड यांच्यातर्फे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

या स्वागत समारंभात होमगार्ड तालुका समादेशक अधिकारी राजेश राजवाडकर, फलटण नायक मारुती लिंगावळे, फलटण नायक शुभांगी देवळेकर, तसेच होमगार्ड कर्मचारी सचिन खोपकर, तेजस भारदे, विजय सणस, सागर निकम, अंकित शिगवण, सचिन पुळेकर, विनायक झगडे, विनीत कदम, स्वरूपा मुकनाक, आकांक्षा गुहागरकर आदी उपस्थित होते.होमगार्डांनी आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून दापोली पोलीसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

होमगार्डांनी आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उपयोग करून दापोली पोलीसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

विशेषतः गावातील सामाजिक सलोखा राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि तरुणांमध्ये जागरूकता वाढवणे यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी यावेळी होमगार्ड कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या सहकार्याची प्रशंसा केली.