रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पोलीस दलाच्या संचलनाने आणि सन्मान सोहळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली, तर पोलीस दलाने शिस्तबद्ध संचलन करून सलामी दिली.

परेड कमांडर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी निखील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, महिला पथक, बँड पथक, गृहरक्षक दल, महिला गृहरक्षक दल, श्वान पथक, फायर टेंडर मिनी रेस्क्यू वाहन आणि अग्निशामन मोटार बाइक यांचा समावेश असलेले संचलन पार पडले. या संचलनाने सोहळ्याला शिस्त आणि उत्साह आणला.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे, संजय मुरकर, दीपक पवार, महेश मुरकर, राजेंद्र सावंत, नितीन डोळस, दिनेश आखाडे, विजय मोरे, प्रकाश झोरे, सोनाली शिंदे, दीपक ओतारी, मिलिंद कदम, प्रितेश शिंदे, संतोष सडकर आणि रमेश चव्हाण यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस दलाच्या योगदानाची प्रशंसा करताना पालकमंत्र्यांनी रत्नागिरीच्या विकासात त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
