दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे.
मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
यंदा किमान तापमानात घट असली तरी उकाडा तीव्र जाणवत आहे.सकाळपासूनच उष्णता वाढत आहे.
दापोलीत दुपारच्या वेळी बाजारात लोक कमी दिसत आहेत. शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत आहेत.
आंबा आणि काजूच्या झाडांना पाण्याअभावी धोका आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान ४० अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे.