रत्नागिरी : ‘कांचन डिजिटल’तर्फे आयोजित गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रा.भा.शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी झालेल्या या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण केले.

त्यांनी ही स्पर्धा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले.

‘कांचन डिजिटल’चे कांचन मालगुंडकर यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून गणपती सजावट स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.

यंदा प्रथमच मूर्ती बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. मूर्तिकार दीपक भडेकर यांनी प्रात्यक्षिक दाखवल्याने विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्यास मदत मिळाली.

शिवा पाटणकर, ओंकार पाटणकर, नरेश पांचाळ, आशिष संसारे, संजय शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

निकाल: प्रथम- रुद्र गुरव, द्वितीय- कनक सातवेकर, तृतीय- स्वराज नाचणकर. विशेष उल्लेखनीय- ओवी वाडेकर, शुभ्रा विखारे, स्वराज गोताड, सारा राऊत, ओम तोडणकर. उत्तेजनार्थ- इशान नागवेकर, केयुर तुळसवडेकर, प्रेम चंदेरकर, प्रचिति मयेकर, सक्षम मोसंबकर, ओम जोशी, स्वरा जाधव, रुद्र पवार, पार्थ कोठेकर, सिद्धी कांबळे. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली.

नरेंद्र पाटील, मुकेश गुंदेजा, शकील गवाणकर, विजय पाडावे, निलेश जगताप यांच्यासह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी केला.