जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक/उचिशा/पोल2/ज.बं.पु.आ.क्र.3/144/2020, दिनांक 30/06/2020 रोजीच्या आदेशान्वये दिनांक 01/07/2020 ते 08/07/2020 या कालावधीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सदर कालावधीत “परिशिष्ट ब” मधील बाबी / सेवा या सुरू राहतील.

“परिशिष्ट अ” (प्रतिबंधित बाबी)
1. सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध.
2. जिल्हयात प्रवेश करणाऱ्या सर्व सिमा बंद.
3. सर्व प्रकारची प्रवासी वाहतुक (दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, रिक्षा, जीप, टॅक्सी, कार, बस) बंद राहील. (अत्यावश्यक सेवा वगळून)
4. अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने/ आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने/ आस्थापना बंद राहतील.
5. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होता येणार नाही.
6. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतेवेळी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सामाजिक अंतर किमान 6 फुट ठेवणे.
7. जमाव जमेल अशी कृती करण्यास प्रतिबंध
8. थुंकण्यास मनाई
9. मदय, पान, तंबाखु इत्यादींच्या सेवनास प्रतिबंध
10. थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर हे प्रवेशाच्या ठिकाणी उपलब्ध ठेवणे संबंधीत आस्थापना प्रमुखावर बंधनकारक राहील.

“परिशिष्ट ब”
(सदर लॉकडाऊनच्या कालावधीत खालील नमूद बाबी/सेवा सुरु राहतील)

1. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दुध व दुधाचे पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था.
2. मांस/मासे/अंडी यांची विक्री दुकाने (बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी सुरु राहतील)
3. शासकीय कामे
4. शेती विषयक कामे, कृषीमाल, प्रक्रिया व साठवणूक
5. मद्य विक्री ऑनलाईन मागणी स्विकारुन घरपोच सेवा
6. अत्यावश्यक सेवा व त्यांच्या आस्थापना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत सुरु राहतील.
7. सायंकाळी 5.00 ते सकाळी 9.00 या कालावधीत केवळ वैद्यकिय तपासणी कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडता येणार नाही
8. वरील बाबी शिवाय अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

 माय कोकण