दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत सामंत यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सर्वांसमोर झापले.

दिव्यांगांची अडवणूक

जिल्ह्यातील विविध भागांतून, अगदी मंडणगडसारख्या लांबच्या ठिकाणांहून दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात येतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. डॉक्टरांनी दिलेली ४०-४५ टक्केवारी या कर्मचाऱ्याने परस्पर कमी केल्याचा धक्कादायक प्रकार बैठकीत उघड झाला.

एजन्सीवर कारवाईचे संकेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘साई मॅनपॉवर’ या एजन्सीने कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा न केल्याची तक्रारही समोर आली आहे. या प्रकरणी मालक हजर न राहिल्याने संतापलेल्या सामंत यांनी एजन्सीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ठेका रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*