दापोली : रत्नागिरी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी नुकतीच दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच शालेय कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी दापोली शिक्षण संस्थेचे सचिव विनोद जोशी यांनी शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे आणि उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.

शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक आणि संस्थेकडून होत असलेल्या प्रयत्नांचे मेंगाणे यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीवेळी शाळेचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक एस.आय. मगदूम, पर्यवेक्षक अनिल पेठकर, पर्यवेक्षिका सोनाली मेहंदळे, शिक्षक राजेंद्र हांडे, जीवन कदम आणि शिक्षकेतर कर्मचारी बाळकृष्ण बामणे उपस्थित होते.