गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

दापोलीत उद्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्यासह अन्य सैनिकांना बुधवारी 15 डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोलीत उद्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

दापोली:- हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन पावलेल्या चीफ आँफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस जनरल बिपिन रावत त्यांच्यासह अन्य सैनिकांना बुधवारी 15 डिसेंबर रोजी दापोलीत नागरिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम बुधवारी 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दापोली पोलीस ठाण्याच्या आवारातील परेड ग्राउंडवर नियोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला तमाम दापोलीकरांनी उपस्थित राहून देशाच्या सर्वोच्च सैनिकांना आदरांजली वाहावी असे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दापोलीतील पत्रकारांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे.

Tribute to CDS General Bipin Rawat in Dapoli tomorrow

माय कोकण प्रतिनिधी

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *