शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत भाजप व झेप फाउंडेशनतर्फे हजारो भाविकांना मोफत सरबत वाटप

कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत भाजप व झेप फाउंडेशनतर्फे हजारो भाविकांना मोफत सरबत वाटप

रत्नागिरी : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने शहरातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर मंडळ आणि झेप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सरबत वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा सुमारे पाच ते सहा हजार भाविकांनी लाभ घेतला.

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर परिसरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळावा आणि सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा घडावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने भाविकांची सेवा करण्याचे समाधान मिळाले असून, समाजहिताचे असे उपक्रम झेप फाउंडेशन आणि भाजपच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

या उपक्रमाप्रसंगी झेप फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश युवा सचिव अद्वैत कुलकर्णी, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी यांच्यासह संतोष सावंत, निलेश आखाडे, विजय माळवदे, सारिका शर्मा, मंदार भोळे, शैलेश बेर्डे, नरेंद्र कदम, प्रीती शिंदे, सिद्धेश नाईक, प्रशांत गावखडकर, प्रणाली शिंदे, प्राजक्ता भोसले, नील ढेकणे, अक्षय खाकोडिया व भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bjp Ratnagiri, Dada Dhekane, Free Sherbet Distribution, Kartiki Ekadashi, Maharashtra News, ratnagiri news, Social Initiative, Vitthal Mandir Ratnagiri, Zep Foundation

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *