रत्नागिरी : कोकणात दोन-चार दिवसांत चक्रीवादळाचा धोका असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, कोकणात कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

भारतीय हवामान खात्याच्या परिपत्रकानुसार अंदमान निकोबार व बंगालचा उपसागर या भागातील हवामान बदलामुळे काही वादळसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास तेथील मच्छीमारांच्या बोटींना कोकणच्या सागर किनारी भागात आश्रय देण्याविषयी विनंती करण्यात आलेली आहे. आपल्या भागात कोठेही चक्रीवादळाचा धोका नाही. त्यामुळे यापूर्वी प्रसिद्ध झालेले वृत्त रद्द करण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन रत्नागिरी न्यूज नेटवर्क करत आहोत.