दापोली : तालुक्यातील जालगाव (लष्करवाडी) येथे जय किसान स्पोर्टस् यांच्यावतीने २४ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष मा. आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, खासदार धैर्यशील पाटील, भारतीय जनता पार्टी, उत्तर रत्नागिरी, जिल्हाध्यक्ष केदार साठे, ‘वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्टस्’चे अध्यक्ष प्रशांत यादव, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, शशिकांत श्रीराम डोंगरे, श्रीराम (भाऊ) इदाते, अजय दळवी यांची उपस्थिती लाभणार आहे.
या स्पर्धेसाठी जालगाव (लष्करवाडी) मधील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय किसान स्पोर्टस्, लष्करवाडी, ग्रामस्थ मंडळ, लष्करवाडी आणि शारदा महिला मंडळ, लष्करवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ: जालगाव लष्करवाडी देवाचे शेत, ता. दापोली, जि. रत्नागिरी.