
रत्नागिरी: केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत भव्य कृतज्ञता फेरी काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी कोकणातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.
शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ ते लक्ष्मीचौक या मार्गावर ही फेरी काढण्यात आली. यात रत्नागिरीसह राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील महिलांचा मोठा सहभाग होता. ‘सशक्त नारी – सशक्त भारत’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

भाजप महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली या फेरीचे नियोजन करण्यात आले. महिलांना आता संसदेत आणि विधानसभेत धोरण निश्चितीची संधी मिळणार असून हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असल्याचे ढेकणे यांनी यावेळी नमूद केले.
लक्ष्मीचौक येथे फेरीची सांगता झाली. यावेळी उपस्थित महिलांनी भव्य फलकावर स्वाक्षऱ्या करून आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन विधेयकाला डिजिटल पाठिंबा दर्शवला.
या फेरीत वर्षा ढेकणे, शिल्पा सुर्वे, मृणाल शेट्ये, नपुरा मुळये, अपेक्षा दाभोळकर, ऐश्वर्या जठार, श्रुती ताम्हणकर, भक्ती दळी, सुप्रिया रसाळ, सुयोगा जठार, स्वाती कानगुटकर, शितल रानडे, रूपाली कदम, सुचिता नाचणकर, अनघा साळवी, शितल पंडित, सायली वाझे, रुई खेडेकर, रूपाली दांडेकर, रसिका देवळेकर, दीप्ती महाडीक, सुप्रिया उत्तेकर, वैशाली निमकर, अंजली कदम, वैदेही बने, शितल दिंडे, सुप्रिया बेंद्रे, भक्ती शेटे, धृवी लाकडे यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सहभागी होत्या.

याप्रसंगी माजी आमदार सुनील राणे, दादा ढेकणे, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, राजू तोडणकर, नितीन जाधव, प्रसाद बाष्ट्ये, प्रशांत यादव, नंदू चव्हाण, नितीन गांगण, राजन पटवर्धन, विक्रम जैन, प्रशांत घाणेकर, राजेश आंबेकर यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कोकणात महिला सक्षमीकरणाचा सकारात्मक संदेश गेला आहे.

Leave a Reply