नागरिकांना पोलीस ठाण्यास ऑनलाईन तक्रार देणे सोईस्कर व्हावे तसेच नागरीकांना इतर सुविधांसाठी सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सिटीझन पोर्टल ही सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.

त्याचे पुर्वीचे डोमेन नाव http://www.mhpolice.maharashtra.gov.in असे होते.

परंतु आता

https://citizen.mahapolice.gov.in असा सिटीझन पोर्टल डोमेन मध्ये बदल करण्यात आलेला आहे.

नागरिकांना कमी वेळेत ऑनलाईन सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून गणेशोत्सव परवाना, नवरात्रौत्सव परवाना तसेच विविध प्रकारची परवाने प्राप्त करणे व ई-तक्रारी करीता उपयोग करावा असे आवाहन डॉ. प्रविण मुंढे, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी केले आहे.