महाराष्ट्र CET च्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांशी संबंधित विविध व्यावसायिक विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. COVID 19चा वाढता प्रादूर्भाव बघता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून दिली आहे. नवीन तारीख लवकरच कळवण्ययात येेईल असंही त्यांंनी म्हटलं आहे.