पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल अखेर शनिवारी, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येईल.

निकालाची अधिक सविस्तर माहिती देण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पुणे येथील राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनंतर लिंक सक्रिय होऊन विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका पाहता व डाऊनलोड करता येतील. फेब्रुवारी मार्चमध्ये पार पडलेल्या या परीक्षेला राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.