दापोली : तालुक्यातील चिखलगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख आणि गाव अध्यक्ष राजेश शिगवण यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि मतदारसंघातील स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिंदे गटाचे शाखाप्रमुख योगेश रामाने, महिला संघटिका तसेच माजी सदस्य संघवी शिगवण आणि प्रकाश कापडी उपस्थित होते.

राज्यासह दापोली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासाभिमुख कार्याला मिळणारा हा वाढता प्रतिसाद निश्चितच शिवसेना पक्षाला तालुक्यात अधिक बळकटी देणारा ठरणार आहे.