रत्नागिरी : जिल्ह्यात २४ जून २०२६ रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये सर्वदूर समाधानकारक पाऊस झाला आहे.
उपलब्ध शासकीय आकडेवारीनुसार, आज जिल्ह्यात एकूण ८९७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याचे आजचे एकूण सरासरी पर्जन्यमान ९९.७१ मिलिमीटर इतके राहिले आहे.
तालुक्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेतला असता, आज सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात १३३.५७ मिलिमीटर इतका नोंदवला गेला असून, त्यापाठोपाठ मंडणगड तालुक्यात ११६.२५ मिलिमीटर आणि संगमेश्वर तालुक्यात ११५.४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

खेड तालुक्यात १०४.८५ मिलिमीटर तर रत्नागिरी तालुक्यात १०१.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या दोन्ही तालुक्यांनी शंभरी पार केली आहे.
याव्यतिरिक्त गुहागर तालुक्यात ९५.६० मिलिमीटर आणि लांजा तालुक्यात ९१.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या संपूर्ण काळात जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ७६.८८ मिलिमीटर पाऊस पडला असून सर्वात कमी पावसाची नोंद चिपळूण तालुक्यात ६२.११ मिलिमीटर इतकी झाली आहे.
हा पाऊस शेतीकामांसाठी अत्यंत पूरक मानला जात असून यामुळे जिल्ह्यातील बळिराजा सुखावला आहे.

