रत्नागिरी: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्कमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आजपासून प्रत्यक्ष शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे.

यादीमध्ये नोंदणीकृत असलेल्या रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे पार पडत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू नागरिकांना मोफत आणि दर्जेदार नेत्रोपचाराची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अनेकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्फिगोचे संचालक श्रीधर ठाकूर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल निलेश राणे मित्र मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. ठाकूर यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी शक्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार नारायण राणे यांचे खासगी सचिव योगेश मगदूम, शोएब खान, पिंट्या देसाई, शैलेश बेर्डे, अक्षय चाळके, अभी पिलनकर, ओमकार आग्रे, निखिल शेट्ये, नरेंद्र बनसोडे, सोहम पिलनकर, संदीप नार्वेकर, प्रणव सुर्वे, राजेश झगडे, विनय कुंभार, शिवाजी कारेकर आणि अभि कारेकर यांच्यासह मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या या शिबिराचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, आगामी काळातही अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.