रत्नागिरी : येथील जे के फाईल्स समोर आणि महानगर गॅस शेजारी अशोक लेलँडच्या लाइट कमर्शियल व्हेईकल (LCV) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या शोरूमचे नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन पार पडले.
या अद्ययावत शोरूमचे उद्घाटन अशोक लेलँडचे बिझनेस हेड विप्लव शहा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अशोक लेलँडचे झोनल मॅनेजर अतुल क्षीरसागर, रिजनल मॅनेजर गौरव ठाकरे, एरिया सेल्स मॅनेजर अभिषेक नाडकर्णी, सुनील पाटील आणि अखिलेश चोपडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लवेकर मोटर्सचे संचालक संदीप लवेकर, श्रेयस लवेकर, कुणाल लवेकर, रश्मी लवेकर, राजेश्वरी पातकर आणि अनुरूप पातकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

या सोहळ्याला आरटीओ अधिकारी शेखर लवेकर, प्रकाश मयेकर, सचीन शिंदे, दैवज्ञ पतपेढीचे विजय पेडणेकर, संतोष भुर्के, प्रमोद खेडेकर, करसल्लागार उज्ज्वल बापट, वरुण फडके, बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर सुधाकर गोन्नाडे आणि प्रदीप गायकवाड यांच्यासह विविध फायनान्स, इन्शुरन्स कंपन्या व बँकांचे अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून अशोक लेलँडच्या ग्राहकांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच वेळी पंधरा ग्राहकांना त्यांच्या नव्या वाहनांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि ग्राहकांनी लवेकर मोटर्सच्या या नव्या व्यावसायिक उपक्रमास व त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

