माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उद्या दापोली दौऱ्यावर

दापोली- एलईडी च्या माध्यमातून होणारी विध्वंसक मासेमारी बंद करणेबाबत दापोली येथील मच्छीमार संघर्ष समिती हि गेले कित्येक दिवस आंदोलन करत आहे. या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात सामील होण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत दिनांक 26 मार्च 2011 रोजी दुपारी 12.00 वाजता दापोली तहसील कार्यालय समोर आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.गेले काही दिवस मच्छिमार समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. यावर शासनाने अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करून या आंदोलनावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*