दापोली : दापोली तालुक्यातील करजगाव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर (वय 67) हे 4 जूनला सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेले असून ते अद्याप घरी परत न आल्याने हरवले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करजगांव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर हे मनोरूग्ण असलेले वृध्द घरातून निघून गेले आहेत. रामा बागकर यांचा रंग गोरा, उंची 5.6 इंच, काळे डोळे, केस पिकलेले, सडपातळ बांधा, सफेद रंगाची बनीयन व चॉकलेटी रंगाची हाफ पँट परिधान केलेली आहे. सदर व्यक्ती कोणाला आढळून आल्यास दापोली पोलिस ठाण्यात माहिती द्यावी असे आवाहन हेडकॉन्स्टेबर अजित गुजर यांनी केले.
करजगाव येथील वृध्द बेपत्ता
दापोली तालुक्यातील करजगाव भंडारवाडा येथील रामा वामन बागकर (वय 67) हे ४ जुन पासुन बेपत्ता
Similar Posts
View All
चिपळूणमध्ये ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत पोलिसांचा छापा; १.३८ लाखांची गांजाची झाडे जप्त, तरुण ताब्यात
दापोलीत प्रथमच शालेय लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार; अक्षय फाटक यांच्या हस्ते उद्घाटन
निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
योग्य संधी मिळाल्यास आदिवासी मुले खेळात करिअर घडवतील; प्रयोगभूमीत कला-क्रीडा उत्सव उत्साहात
भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणची आढावा बैठक उत्साहात; संघटनात्मक बांधणीवर भर

Leave a Reply